उरण : दसऱ्याच्या मुहूर्तावर घरातील लक्ष्मी म्हणून गणले जाणारे घर, इमारत, वाहन तसेच घरातील इतर वस्तुंच्या पूजनासाठी भाताचे कणीस, आंब्याची पाने, झेंडू आणि विविध प्रकारची रानफुलांनी तोरण बनविले जाते. मात्र विविध प्रकल्प, रस्ते व विकासकामांसाठी लागणारी माती, दगड याकरीता येथील भात शेतीच्या जमीनी, डोंगर, त्यातील वृक्ष उध्वस्त केली जात आहेत.

भाताच्या कणसाच्या दहा कड्यांचे २० रुपये, आंब्याची फांदी २० रुपये, रानफुलं एक जुडी २० रुपये या दराने विक्री केली जात आहेत. नष्ट करण्यात आलेल्या शेती आणि डोंगरावर येणारे भात पीक,आंब्याची वृक्ष आणि रानातील फुल यामुळे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या वनस्पतींच्या किंमतीचे दर वाढू लागले आहेत. परिणामी दसऱ्याला परंपरेने बांधण्यात येणारे तोरणही महागले आहे.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्ताने नवी मुंबईत लगबग; सहा लाख चौरस फुटांचा मंडप, चार हजार गाडय़ांची व्यवस्था

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपट्याच सोनंही कडाडणार

दसऱ्याच्या दिवशी परंपरेने आपट्याच्या झाडाची पाने सोनं म्हणून दिली जातात. मात्र या आपट्याची झाडे ही मोठया प्रमाणात कमी झाल्याने जवळपास मोफत मिळणाऱ्या आपट्याच्या पानामुळे दसऱ्याच्या आपट्याचं सोनं ही महागलं आहे.