Methi Shankarpali Recipe : सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. घर सजवण्यापासून ते दिवाळीच्या फराळाची लगबग दिसत आहे. दिवाळीच्या फराळातील एक एक पदार्थ खूप महत्त्वाचा असतो. अशात आज आपण शंकरपाळेची हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. शंकरपाळे आपण सहसा मैद्यापासून बनवतो पण आज आपण मेथीपासून पौष्टिक शंकरपाळे बनवणार आहोत. हे मेथी शंकरपाळे कसे बनवायचे, चला तर जाणून घेऊ या.

साहित्य

मैदा
बारीक चिरलेली मेथी
धनेपुड
जिरे पावडर
लाल तिखट
हळद
धनेपूड
तेल
ओवा
मीठ

हेही वाचा : ‘या’ तीन टिप्सने वाढवा चहाचा स्वाद; टपरीवरचा चहा विसराल, ही सोपी रेसिपी नोट करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

एका भांड्यामध्ये प्रमाणानुसार मैदा घ्या.
त्यात बारीक स्वच्छ पाण्याने धुतलेली आणि बारीक चिरलेली मेथी टाका.
त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, धनेपूड आणि जिरे पावडर टाका.
त्यात थोडा ओवा टाका.
चवीनुसार मीठ टाका.
मिश्रणाच्या प्रमाणानुसार थोडे तेल टाका.
सर्व मिश्रण एकत्र करा आणि पाण्याने मळून घ्या.
या मळलेल्या पीठावर मैदा टाकून लाटून घ्या आणि शंकरपाळे सारखे काप पाडा.
कढईत तेल गरम करा आणि हे मेथीचे शंकरपाळे मंद आचेवर तळून घ्या.
मेथीचे शंकरपाळे तयार होईल.