News Flash

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी दहा कोटींचा निधी

स्वत: गणवेश खरेदी करण्याची मुभा

प्रातिनिधीक छायाचित्र

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी तब्बल दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण, आदिवासी तसेच नागरी क्षेत्रातील ५५३ प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविका यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षातील गणवेशासाठी १०.६८ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली. निधीचे वितरण तातडीने करावे, असे आदेश त्यांनी ‘आयसीडीएस’च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा निधी अंगणवाडी सेविकांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. राज्यातील एकूण ९५ हजार ९२८ अंगणवाडी सेविका, ९२ हजार ३६० अंगणवाडी मदतनीस व ११ हजार ६४ मिनी अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार आहे.

याकरिता १० कोटी ६८ लाख ९१ हजार रुपयांची तरतुद करुन प्रकल्प स्तरावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. एकात्मिक बालविकास सेवा यांजनेअंतर्गत राज्यातील एकुण ५५३ प्रकल्पस्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याबाबतचे आदेश संबधित कार्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांनी दिली. अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना या निधीमधून स्वत: गणवेश खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 2:14 pm

Web Title: 10 crores fund for anganwadi workers in maharashtra
Next Stories
1 पोलिसांना गुंगारा देऊन सांगलीत दोन आरोपी पसार
2 आरक्षण बदलले तर सरकार बदलेल!
3 गुलाबी अळीचा यंदा कापसाला फटका
Just Now!
X