गेल्या चोवीस तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाने वेंगुर्ले व मालवण तालुक्यांत द्धिशतक केले आहे. वेंगुर्ला तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून २६४.४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मालवण तालुक्यातही पावसाने द्विशतक केले असून कुडाळ आणि दोडामार्ग तालुक्यातल पावसाने एका दिवसात शंभरी पार केली आहे.

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी १३७ मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ४४४४.१९४ मि.मी इतका सरासरी पाऊस झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे, सोमवारी रात्री अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळत होता त्यामुळे सर्वत्र पूर आल्याने भात शेती पाण्याखाली गेली होती. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. दोडामार्ग १४५ (४७१८ ), सावंतवाडी ९० (४८६५ ), वेंगर्ला-२६४.४० (४३८७), कुडाळ – १४० (४३०७.५५) मालवण- २५४ (५५०६), कणकवली- ६७ (४००३), देवगड -९८ (३५६४), वैभववाडी -४५ (४२०३) या प्रमाणे पाऊस झाला आहे.