राज्यात आज १४ हजार ४९२ करोनाबाधितांची वाढ झाली व २९७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, दिवसभरात ९ हजार २४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६ लाख ६१ हजार ९४२ वर पोहचली असून, यामध्ये आतापर्यंत करोनामुक्त झालेले ४ लाख ८० हजार ११४ जण आणि १ लाख ६९ हजार ५१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७१.४५ टक्के झाले आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आजपर्यंत प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ तपासण्यां पैकी आजपर्यंत ६ लाख ६१ हजार ९४२ तपासण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. राज्यात सद्यस्थितीस १२ लाख ११ हजार ६०८ जण गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) आहेत. तर, ३५ हजार ३७१ जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन) मध्ये आहेत.

मुंबईत आज १ हजार १३४ नवे करोनाबाधित आढळले तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, १ हजार १०१ जण करोनामुक्त झाले. मुंबईतली करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ३५७ वर पोहचली असून यामध्ये १८ हजार २९८ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले १ लाख ९ हजार ३६९ जण आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७ हजार ३८५ जणांचा समावेश आहे.