देशभरासह राज्यभरात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे जमल्या जाणाऱ्या पोलिसांनाही दिवसेंदिवस करोनाचा अधिकच संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. केवळ संसर्गच नाहीतर करोनामुळे पोलिसांचा मृत्यू देखील होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात आणखी १६१ पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १४ हजार ९५३ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ८०० जण, करोनामुक्त झालेले ११ हजार ९९९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १५४ जणांचा समावेश आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १४ हजार ९५३ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५९६ अधिकारी व १३ हजार ३५७ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ८०० पोलिसांमध्ये ३६४ अधिकारी व २ हजार ४३६ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या ११ हजार ९९९ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार २१७ व १० हजार ७८२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १५४ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १३९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.