सोलापूर शहरात पुणे नाक्याजवळ खासगी आराम बस एका कंटेनरवर आदळल्याने घडलेल्या अपघातात बसमधील १८ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व जखमींना तातडीने छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पूजा ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस पुण्याहून सोलापूरमार्गे भालकी (बीदर, कर्नाटक) येथे निघाली होती. सोलापुरात पुणे नाक्याजवळ ही बस आली असता तेथे पाणी टाकीसमोर रस्त्याच्या एका बाजूला थांबलेल्या कंटेनरवर सदर बस आदळली. या अपघातातील जखमींमध्ये सरोजा मारुती बिराजदार (२४, रा. शिवगणेश नगर, भोसरी, पुणे), तिची मुलगी भूमिका बिराजदार (५) यांच्यासह पूजा साईनाथ चिंचोळे (१८, रा. भोसरी, पुणे), संतोष वैजिनाथ भोसले (३४), सतीश सुभाष बंडीवाले (२३, रा. संत तुकारामनगर, भोसरी), हणमंतुबाई अणगिरप्पा भजाळे (६०), अर्जुन वाडेकर (६५), वीरम्मा विभूते (४०, रा. हुमनाबाद, जि. बिदर), वैजिनाथ यादवराव मुदगे (६०), मनोहर भाऊराव पाटील (५०, रा. बसवकल्याण, जि. बिदर) यांचा समावेश आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2014 रोजी प्रकाशित
सोलापुरात खासगी आराम बस कंटेनरवर आदळून १८ जखमी
सोलापूर शहरात पुणे नाक्याजवळ खासगी आराम बस एका कंटेनरवर आदळल्याने घडलेल्या अपघातात बसमधील १८ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
First published on: 20-09-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 injured in accident between private bus and container in solapur