X
X

रेल्वे प्रवासात दात घासणे तरुणीच्या जीवावर बेतले

READ IN APP

वडील दौलत सोळंखी यांनी तिला तातडीने सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले.

एक्स्प्रेसमधून प्रवास करताना दरवाजाजवळ उभे राहून दात घासणे एका तरुणीच्या जीवावर बेतले. दात घासताना तोल गेल्याने तरुणी एक्स्प्रेसमधून पडली असून लातूर-उस्मानाबाद दरम्यान मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथे राहणारी आरती दौलत सोळंखी (वय १८) ही तरुणी लातूरहून कल्याणला जाण्यासाठी निघाली होती. आरतीसोबत तिचे वडील दौलत सोळंखी हे देखील होते. लातूर ते उस्मानाबाद दरम्यान रेल्वे डब्यात दरवाजाजवळ उभी राहून ती  दात घासत होती. यादरम्यान आरतीचा तोल गेल्याने ती ट्रेनमधून खाली पडली. यात तिचे दोन्ही हातांसह डोके आणि पायांना गंभीर जखम झाली. वडील दौलत सोळंखी यांनी तिला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

22
X