24 February 2019

News Flash

धक्कादायक: बॉयफ्रेंडसमोरच तरूणीवर सामूहिक बलात्कार

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर चारही नराधमांना अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

नक्षलग्रस्त भाग अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत एका १९ वर्षीय तरुणीवर तिच्या बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ ऑगस्टला ही घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४ नराधमांना अटक केली आहे. चमरोशी तालुक्यातील कृष्ण नगर गावात ही घटना घडल्याचे पोलीस अधिकारी गोरख गायकवाड यांनी सांगितले. १९ वर्षीय तरूणी तिच्या बॉय फ्रेंडसोबत लालडोंगरी परिसरात फिरायला गेली होती.

या दोघांना मोटरसायकलवर येताना चारही नराधमांनी पाहिले.त्यानंतर या चौघांनी त्यांची मोटरसायकल अडवली. या मुलीच्या बॉयफ्रेंडला त्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर झुडपात नेऊन या मुलीवर बलात्कार केला. एवढेच नाही या दोघांकडे असलेले ४ हजार रूपयेही या सगळ्यांनी हिसकावून घेतले. या तरूणीला स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निखिल मंडल, महादेव बराई, राजेश डकवा आणि स्वरूप मिस्त्री या चौघांना बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on September 4, 2018 7:50 am

Web Title: 19 year girl gang raped in gadchiroli in front of her boy friend