07 March 2021

News Flash

पुण्यात मौलवीकडून १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार

तरूणीच्या तक्रारीनंतर मौलवीला करण्यात आली अटक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका मौलवीने मुंबईत राहणाऱ्या एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत राहणाऱ्या या तरूणीला पुण्यात उच्च शिक्षणासाठी मदत करतो असे या मौलवीने सांगितले होते. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ५० वर्षीय मौलवी युनुस हाशिम शेख याला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी मुंबईची आहे. या प्रकरणातला मौलवी युनुस शेख हा मुंबईत या तरूणीच्या घराशेजारी नेहमी येत असे. त्याची या तरूणीशी ओळख झाली. पीडित तरूणीने या मौलवीला गुरु मानले होते. त्यानंतर या तरूणीला उच्च शिक्षणासाठी पुण्यात यायचे होते. त्यामुळे पुण्यात मुलीला वास्तव्य करण्यासाठी हॉस्टेल पाहा असे या मौलवीला तिच्या घरातल्यांनी सांगितले. हॉस्टेल उपलब्ध नसल्याने पुण्यातील हडपसर राहता येईल असे या मौलवीने सांगितले. मौलवीने सांगितल्यावर पीडित तरूणी हडपसर मध्ये राहू लागली. ही पीडित तरूणी मौलवीच्या घरी राहात होती. मौलवी, त्याची पत्नी आणि ही मुलगी असे काही दिवस एकत्र राहात होते.

एके दिवशी युनुस शेखने त्याची पत्नी बाहेर गेल्यावर या तरूणीचे अश्लील फोटो काढले आणि घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आई वडिलांना ठार करेन अशीही धमकी दिली. मौलवीने दिलेल्या धमकीमुळे ही तरूणी शांत राहिली. मात्र मुंबईत परतल्यावर या तरूणीने आपल्या आई वडिलांना सगळा प्रकार सांगितला. पीडित तरूणीच्या आई वडिलांनी दत्तवाडी पोलीस ठाणे गाठत मौलवी विरोधात तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत मौलवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 12:42 pm

Web Title: 19 year old girl sexually tortured by maulvi in pune
Next Stories
1 रिक्षेची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदाराविरोधात गुन्हा
2 शाळांना सीसीटीव्ही सक्ती!
3 पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्यासाठी भूसंपादनाचे आदेश
Just Now!
X