30 November 2020

News Flash

चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात २०३ नवे करोनाबाधित रुग्ण

एकूण रुग्णसंख्या अडीच हजाराच्या पार

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २४ तासात आणखी २०३ कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २ हजार ५४७ वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या १ हजार २६९ असून आतापर्यंत १ हजार २४९ बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, बाबुपेठ चंद्रपूर येथील ५५ वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला २२ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. तसेच ४५ वर्षीय ऊर्जानगर चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचाही मृत्यू झाला आहे. या रुग्णाला २० ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार होता. तर तिसरा मृत्यु हा ६५ वर्षीय गांधी वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 7:28 pm

Web Title: 203 new covid 19 patients found in chandrapur district psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन कायम, नियमावली जाहीर
2 ई-पासची अट रद्द, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
3 अंतिम वर्षाच्या परीक्षांसंबंधी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Just Now!
X