01 June 2020

News Flash

अकोल्यात आणखी २३ रुग्णांची वाढ, एकूण संख्या ३७० च्याही पुढे

१३ रुग्णांना आज देण्यात आला डिस्चार्ज

अकोला  शहरात करोनाचा प्रकोप सुरूच असून, शनिवारी आणखी तब्बल २३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३७८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १३६ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

अकोला करोना संसर्गाचा सातत्याने वाढत आहे. शनिवारी आणखी २३ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण १५३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १३० अहवाल नकारात्मक, तर २३ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३७८ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत २१९ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १३६ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळच्या अहवालानुसार सात रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. सात रुग्णांमध्ये सहा महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यात पाच जण फिरदोस कॉलनी येथील रहिवासी असून, टिळक मार्ग व लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी १६ रुग्णांची भर पडली. त्यामध्ये नऊ महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील फिरदोस कॉलनी, लोहिया नगर खोलेश्वर येथील प्रत्येकी दोन, माळीपूरा, मोहम्मद अली रोड, नानकनगर निमवाडी, चांदखाँ प्लॉट, गोरक्षण रोड मलकापूर, यमुना संकूल, श्रावणी प्लॉट, हरिहर पेठ, इकबाल कॉलनी, मलकापूर, रेल्वे झोन रामदास पेठ, दसेरा नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नवे करोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण करून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

दरम्यान, करोनातून बरे झालेल्या पाच जणांना शुक्रवारी रात्री, तर आज दुपारी आठ अशा एकूण १३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. काल रात्री सोडण्यात आलेल्यांमध्ये दोघे खैर मोहम्मद प्लॉट येथील, तर अन्य फिरदोस कॉलनी, अगरवेस व अकोट फैल भागातील रहिवासी आहेत. या पाचही जणांना घरी सोडण्यात आले. आज दुपारी आठ महिलांना सुट्टी देण्यात आली. त्यातील दोन महिलांना घरी सोडण्यात आले. त्या फिरदोस कॉलनी व सुभाष चौक येथील रहिवासी आहेत. अन्य सहा महिलांना संस्थात्मक विलगीकरणात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यात फिरदोस कॉलनीतील दोन, तर रेवती नगर, सुभाष चौक, टिळक मार्ग व लोहिया नगर येथील प्रत्येकी एक रहिवासी आहे.

अर्ध्याहून अधिक शहर प्रतिबंधित
अकोला शहरात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण संख्येत भर पडत आहे. सोबत मृत्यूचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागातून रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण आढळून आलेला परिसर प्रशासनाकडून प्रतिबंधित करण्यात येतो. अर्ध्याहून अधिक शहर प्रतिबंधित झाले आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत शहरातील एकूण प्रतिबंधित क्षेत्राची संख्या ६८ होती. या भागांमध्ये हजारो नागरिक रहिवासी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 7:51 pm

Web Title: 23 new corona cases in akola total number is 378 scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी दत्तात्रय शिंदे यांची नेमणूक
2 महाराष्ट्रातल्या १६७१ पोलिसांना करोनाची बाधा, १८ मृत्यू
3 विदर्भात उष्णतेची लाट, नागपूरचे तापमान ४६.५ अंशांवर
Just Now!
X