News Flash

रायगडमध्ये दिवसभरात २३ रुग्ण

पनवेल मनपा हद्दीत १७, पनवेल ग्रामीण हद्दीत करोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत करोनाचे २३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १९० वर पोहोचली आहे. पनवेल मनपा हद्दीत १७, पनवेल ग्रामीण हद्दीत करोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील १२७८ जणांची करोना चाचणी करण्यात आली. यातील १०६० जणांचे अहवाल नकारात्मक आले. १९० जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले, तर २८ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात १२८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यात पनवेल मनपा हद्दीतील ८७, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३३, उरणमधील ३, श्रीवर्धनमधील १, कर्जतमधील १ तर अलिबागमधील २ तर महाडमधील एका रुग्णाचा समावेश आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:18 am

Web Title: 23 patients in a day in raigad abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सुरक्षिततेच्या कारणावरुन हिरे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष
2 धनगर समाजातील नेतृत्वाला पडळकरांच्या निवडीतून संधी
3 करोनामुक्त ६ रुग्ण ‘कृष्णा’मधून स्वगृही
Just Now!
X