जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नवीन २३ गावांची निवड करण्यात आली असून, त्यानुसार देवगड तालुक्यातील वळीवंडे व शेवरे, वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे व तिरवडे ऊर्फ खारेपाटण, कणकवली तालुक्यातील वारगांव, कसवण तळवडे व धारेश्वर कासार्डे, मालवण तालुक्यातील वायंगणी, वराड, पोईप व मसुरे, कुडाळ तालुक्यातील किनळोस, बांबुळी, केरवडे कर्याद नारूर व साळगांव, वेगुर्ले तालुक्यातील रावदस कुशेवाडा व पेंडूर, सावंतवाडी तालुक्यातील मळगांव, गेळे, नेमळे व माजगांव, दोडामार्ग तालुक्यातील माटणे व वझरे आदी गावांची निवड करण्यात आली आहे.

शिवार फेरी नियंत्रक अधिकारी म्हणून वळीवंडे गावासाठी देवगड तहसीलदार, शेवरे गावासाठी गटविकास अधिकारी देवगड, उंबर्डे गावासाठी वैभववाडी तहसीलदार, तिरवडेतर्फे खारेपाटण गावासाठी वैभववाडी तहसीलदार, वारगांव गावासाठी प्रकल्प संचालक आत्मा, कसवण तळवडे गावासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली, धारेश्वर कासार्डे गावासाठी कणकवली तहसीलदार, वायंगणी गावासाठी प्रकल्प संचालक आत्मा, वराड गावासाठी उपविभागीय अधिकारी कणकवली, पोईप गावासाठी मालवण तहसीलदार, किनळोस बांबुळी, केरवडे कर्याद नारूर व साळगांव इत्यादी गावांसाठी कुडाळ तहसीलदार, रावदस-कुशेवाडा गावासाठी वेंगुर्ला तहसीलदार, पेंडूर गावासाठी गटविकास अधिकारी वेंगुर्ला, तसेच मळगांव, गेळे, नेमळे इत्यादी गावांसाठी सावंतवाडी तहसीलदार, माटणे गावासाठी कृषी उपसंचालक जि.अ.क. तर वझरे गावासाठी दोडामार्ग तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली आहे.