20 September 2018

News Flash

कोळसा टंचाईमुळे सात केंद्रातून केवळ ३० टक्केच वीजनिर्मिती

नागपूरजवळील बुटीबोरी येथील रिलायन्स पॉवर कंपनीतून ६२१ मे.वॅट वीज तयार करते.

(संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

खासगी प्रकल्पांना मात्र मुबलक कोळसा,  ‘महाजनको’ला आर्थिक फटका

HOT DEALS
  • Sony Xperia XZs G8232 64 GB (Warm Silver)
    ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
    ₹3500 Cashback
  • Moto C Plus 16 GB 2 GB Starry Black
    ₹ 7999 MRP ₹ 7999 -0%

चंद्रपूर : महाजनकोच्या राज्यातील सातही केंद्रांना कोळसा टंचाई जाणवत असल्याने या केंद्रातून केवळ ३० टक्के वीजनिर्मिती होत असून खासगी प्रकल्पात मात्र हे प्रमाण ७० टक्के आहे. दरम्यान, राज्य सरकार सद्यस्थितीत खासगी प्रकल्पातून ६३०० मेगावॅट वीज  खरेदी करीत आहे.

महाजनकोची राज्यात चंद्रपूर, नाशिक, कोराडी, भुसावळ, परळी, खापरखेडा व पारस अशी एकूण सात वीजनिर्मिती केंद्र आहेत.  या सातही केंद्रांतून केवळ ३० टक्के वीजनिर्मिती होत आहे. याउलट स्थिती खासगी वीज प्रकल्पांची आहे. या प्रकल्पांना मुबलक कोळसा मिळत असल्याने गोंदिया जिल्हय़ातील तिरोडा येथील अदानी पॉवर कंपनीच्या (क्षमता ३३०० मे.वॅट) प्रकल्पातून २२२५ मे.वॅट अधिक  वीजनिर्मिती होते. अमरावती जिल्हय़ातील नांदगावपेठ येथील रतन इंडिया पॉवर कंपनी (क्षमता १३००) ९६१ मे.वॅट वीजनिर्मिती करत आहेत. नागपूरजवळील बुटीबोरी येथील रिलायन्स पॉवर कंपनीतून ६२१ मे.वॅट वीज तयार करते. या सर्व खासगी प्रकल्पातून आज घडीला ७० टक्के वीजनिर्मिती होत आहे.

दरम्यान, कोळसा टंचाईमुळे महाजनकोच्याच प्रकल्पांना फटका बसला  असून ही टंचाई  कृत्रिम असल्याचे महाजनकोतील सूत्रांचे म्हणणे आहे. सातही वीज केंद्रांतून ऊर्जा मंत्रालयाला दररोज कोळसा आणि वीज उत्पादन याची माहिती दिली जात आहे. सोबतच कोळसा टंचाईबाबतही कळवले जाते. तरीही अधिकारी मात्र कोळशाचे संकट नाही, असे सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात विजेची मागणी कमी झाली असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात १४,७०० मेगावॅटची मागणी असून महाजनकोकडे सर्व स्रोत मिळून केवळ ४,४२४ मे.वॅटट वीज आहे. परिणामी, आज खासगी प्रकल्पांकडून ६,३०० मे.वॅट वीज खरेदी करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, या सर्व प्रकारामुळे महाजनकोच्या आर्थिक उत्पन्नाला फटका बसला आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षांत महाजनकोला वीज विक्रीतून १९,२९३ कोटीचा महसूल प्राप्त झाला होता. गेल्यावर्षी तो कमी होऊन १८१६४ कोटीवर आला आहे. महसुलाची घट ही ५.८५ टक्के आहे. हीच स्थिती २०१७-१८ या आर्थिक वर्षांची सुद्धा आहे.

२०१५-१६ मध्ये महाजनकोला मागणीच्या तुलनेत ८०.६० टक्के कोळसा प्राप्त झाला होता, तर २०१६-१७ या वर्षी केवळ ७४.९८ टक्के कोळसा मिळाला. त्या तुलनेत यावर्षी कोळसा मिळण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे येत्या काळात विजेचे संकट अधिक गडद होणार आहे.

खासगी प्रकल्पांकडून खरेदी (मे.वॅट मध्ये)

* अदानी पॉवर कंपनी –       २२२०

* जिंदल –                           ६२६

* रतन इंडिया पॉवर –          ९६०

* रिलायन्स, बुटीबोरी –       ६१९

* वर्धा पॉवर, वरोरा –           ९९

* इतर –                              १८३२

महाजनकोचे प्रकल्प

क्र.    केंद्र व क्षमता  वीजनिर्मिती (मे.वॅट)

१)    नाशिक ( ६३०मे.वॅट.)  १४८(२३ टक्के)

२)    कोराडी ( २४०० मे.वॅट.) ६४५ (२६  टक्के)

३)    भुसावळ ( १२१ मे.वॅट.) ३६० (२९ टक्के)

४)    परळी (११७० मे.वॅट.)  २४०(२० टक्के)

५)    चंद्रपूर(२९२० मे.वॅट.)  १५००

First Published on September 5, 2018 12:44 am

Web Title: 30 percent power generated from seven plant due to coal shortage