News Flash

करोनाच्या दुसऱ्या लाटेत अमरावती विभागात ३४१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

अमरावती विभागातील सर्वाधिक १०३ आत्महत्या यवतमाळ जिल्ह्य़ातील आहेत.

संग्रहित छायाचित्र/

नागपूर : राज्य शासन शेतकऱ्यांसाठी खूप काही करत असल्याचे दाखवते. परंतु जानेवारी २०२१ ते मे २०२१ या करोनाच्या दुसऱ्या लाटेतील कालावधीत अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांत ३४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्यांच्या चौकशीत आर्थिक कारण असलेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरवत त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख रुपये शासन मदत करते. परंतु ३१ मे २०२१ पर्यंत येथील एकूण आत्महत्यांपैकी ६७.१५ टक्के प्रकरणांची (२२९ प्रकरणे) चौकशी प्रलंबित असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.

अमरावती विभागातील सर्वाधिक १०३ आत्महत्या यवतमाळ जिल्ह्य़ातील आहेत. येथे ६३ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांतील १५ प्रकरणे पात्र, २५ प्रकरणे अपात्र असून १५ पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत केली. बुलढाणा जिल्ह्य़ात ९७ आत्महत्या झाल्या. त्यातील ८२ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांत २ प्रकरणे पात्र तर १३ प्रकरणे अपात्र आहे. येथे २ पात्र कुटुंबीयांना आर्थिक मदत केली गेली. अमरावतीत ७३ आत्महत्या झाल्या. त्यातील ४८ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर २१ आत्महत्या पात्र तर ४ अपात्र असून २१ पात्र कुटुंबीयांना मदत दिली गेली. अकोल्यात ४८ आत्महत्या झाल्या. त्यातील ३२ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांतील १४ पात्र तर २ अपात्र असून १४  पात्र कुटुंबीयांना मदत दिली गेली. वाशीममध्ये २० आत्महत्या झाल्या. त्यातील ४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. इतर प्रकरणांत १ पात्र तर १५ अपात्र ठरले. एक पात्र कुटुंबाला मदत दिल्याचेही माहितीच्या अधिकारातून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील पुनर्वसन शाखेचे प्रशांत देशमुख यांनी अभय कोलारकर यांना कळवले आहे.

 

वर्ष २०२० मध्येही १,१३६ आत्महत्या

राज्यात करोनाची पहिली लाट मार्च २०२० पासून सुरू झाली होती. दरम्यान, अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांत २०२० या वर्षांत १ हजार १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चौकशीत पैकी ५०२ प्रकरण पात्र, ५४५ प्रकरणे अपात्र ठरले. ८९ प्रकरणांची चौकशी अद्यापही प्रलंबित असून ५०२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली गेली.

अमरावती विभागातील वर्षनिहाय

शेतकरी आत्महत्येची स्थिती

जिल्हा                २०१७         २०१८         २०१९            २०२०

अमरावती           २७३            २३८            २६९               २९५

अकोला              १६७            १४२            १२४               १५९

यवतमाळ           २४२             २५५           २८८               ३१९

बुलढाणा             ३१२             ३१६            २८१               २७०

वाशीम               ७२               ९८               ९२                  ९३

एकूण               १०६६              १०४९        १०५४             ११३६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 1:46 am

Web Title: 341 farmers commit suicide in amravati division in second wave of corona zws 70
Next Stories
1  ‘हनी ट्रॅप’मध्ये तरुण, तरुणींना अडकवून ‘ब्लॅकमेलिंग’
2 ‘म्युकरमायकोसिस’चा मृत्यूदर करोनाच्या सातपट
3 इशारा अतिवृष्टीचा, प्रत्यक्षात हलक्या सरी!
Just Now!
X