01 March 2021

News Flash

संतोष पोळने माझ्यासमोरच तीन खून केले; ज्योती मांढरेची कोर्टात साक्ष

सोने व पैशाच्या हव्यासापोटी केले खून

वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी संतोष पोळ याने ‘माझ्यासमोर मंगला जेधे, सलमा शेख, भंडारी यांचा इंजेक्शन देऊन खून केला. या घटनेनंतर त्याने आनंद व्यक्‍त केला. तसेच बहुतेक खून हे पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटी केले,’ अशी साक्ष न्यायालयात दिली. दरम्यान, आता पुढील सुनावणी दोन जानेवारी रोजी होणार आहे. सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशात हादरवणार्‍या वाई-धोम हत्यांकाड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे काम पाहत असून शनिवारी ते न्यायालयात उपस्थित होते. माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिने पोळच्या सांगण्यावरून आपणच मंगला यांना पोळच्या पोल्ट्री फार्मवर आणल्याचेही तिने यावेळी सांगितले.

मी पोळच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याने तीन खून केले होते तर मी संपर्कात आल्यानंतर मंगला जेधे, सलमा शेख व नथमल भंडारी यांचे खून केले. यातील बहुतेक खून हे पोळ याने पैशाच्या व सोन्याच्या हव्यासापोटीच केल्याची साक्ष ज्योती मांढरे हिने न्यायालयात दिली. शनिवारी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ज्योतीची साक्ष घेतली. त्यानंतर पोळचे वकील श्रीकांत हुडगीकर यांनी उलट तपासणीला सुरुवात केली.

परंतु न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने पुढील सुनावणी दोन जानेवारीला होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सुनावणीवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खटल्याच्या कामकाजाशी संबंधितांशिवाय इतर कोणालाच न्यायाधीशांच्या दालनात प्रवेश नव्हता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 11:59 am

Web Title: 36 murdered santosh court joyti mandhare nck 90
Next Stories
1 लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा करणार?; मुख्यमंत्र्यांच्या संवादाकडे जनतेचं लक्ष
2 शिवसेनेसारखी कामं करायची नाहीत; चंद्रकांत पाटालांचा भाजपा नगरसेवकांना सल्ला
3 गोवा राज्याच्या बनावट मद्य वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष तपासणी नाका
Just Now!
X