18 September 2020

News Flash

जामखेड कारागृहातून चार कैद्यांचे पलायन

जामखेड तालुक्यातील जेलमधून शुक्रवारी मध्यरात्री चार अट्टल गुन्हेगारांनी पलायन केल्याची घटना घडली.

| June 13, 2015 12:47 pm

जामखेड तालुक्यातील जेलमधून शुक्रवारी मध्यरात्री चार अट्टल गुन्हेगारांनी पलायन केल्याची घटना घडली. जेलच्या छताची कौल तोडून रात्री बारा एकच्या सुमासार या चौघांनी पलायन केल्याचे कळते.
जेलच्या छताची कौलं तोडून या चौघांनी पोबारा केल्याचं समोर आलं आहे. जबरी चोरी आणि दरोड्याचा आरोप या कैद्यांवर आहे. जामखेड पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी ज्या बारा गंभीर गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला होता. त्याच गुन्ह्यांमध्ये हे सर्व आरोपी अटक करण्यात आले होते. जोरदार पावसामुळे गायब झालेल्या वीजेचा फायदा घेऊन कैद्यांनी पोबारा केल्याचे समजते. हे सर्व कैदी दरोडे आणि चोरीच्या आरोपांखाली अटकेत होते.  घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुखांनी सबजेलकडे धाव घेतली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 12:47 pm

Web Title: 4 prisoners absconded from jamkhed jail
Next Stories
1 कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
2 मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणानंतर टोल आकारणार -अनंत गीते
3 संत्र्याच्या उत्पादनात महाराष्ट्र पुन्हा मागे
Just Now!
X