गडचिरोली जिल्ह्यात आज (मंगळवार) एकूण ४३ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. यांपैकी ४२ रूग्ण हे सीआरपीएफचे जवान आहेत. जिल्हयात ६०० हून अधिक सीआरपीएफ जवान गेल्या आठवड्यात दाखल झाले आहेत. या सर्वांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. त्यातील आज एकाच दिवशी ४२ जण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सिरोंचा येथील व्यक्तीचा हैदराबाद येथील प्रवासामुळे करोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाला. ही व्यक्ती आईच्या उपचारांसाठी हैदराबाद येथे गेली होती. पुन्हा ही व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर तिला संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्याच्या आईचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दिलासादायक म्हणजे आज १८ सीआरपीएफ व स्थानिक सिरोंचा येथील एक रूग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे.