शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीनला सभागृहात मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या पाच नगरसेवकांविरोधात शुक्रवारी (ता.17) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनने यांच्या जबाबावरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. मतीन यांना सभागृहात बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांना अटक केली आहे.

वाचा – औरंगाबाद: भाजपा नेत्याची गाडी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली, चालकाला मारहाण

शुक्रवारी औरंगाबाद महानगर पालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध दर्शवला.  यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.   त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे काल शहरात तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते.

वाचा : औरंगाबाद: वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण