16 October 2019

News Flash

आंबेडकर जयंती साजरी करुन परतताना अपघात, आठ महिन्यांच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

स्कॉर्पिओ आणि ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला

बुलडाण्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. स्कॉर्पिओ आणि ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. मेहकर-डोनगाव रस्त्यावर हा अपघात झाला. रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारा अंजनी फाट्याजवळ ही दुर्घटना घडली.

जुमडे कुटुंब डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी मध्य प्रदेशातील महू येथे गेले होते. जुमडे कुटुंब स्कॉर्पिओमधून प्रवास करत होतं. परतत असताना त्यांच्या स्कॉर्पिओ आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात जुमडे कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये आठ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे.

अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी आहे. जुमडे कुटुंब मेहकर तालुक्यातील अंजनी गावचे रहिवासी होते. काळाने अशा पद्धतीने त्यांच्यावर घाला घातल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

First Published on April 15, 2019 11:49 am

Web Title: 5 family members died in accident in buldhana returing after celerbrating ambedkar jayanti