News Flash

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ६५ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ च्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले आहे.

| October 16, 2014 04:22 am

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ च्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून, सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तीनही मतदारसंघांतून प्राप्त माहितीनुसार सरासरी ५६ टक्के मतदान झाले असून सायंकाळी सहापर्यंतचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त होणार असल्याने जिल्ह्यात अंदाजे सरासरी मतदानाची टक्केवारी ६५ टक्केपर्यंत होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी ई-रवींद्रन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मतदानाच्या दिवशी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी ई. रवींद्रन बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अभर करगुटकर या वेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी ई. रवींद्रन म्हणाले, जिल्ह्य़ात आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले आहे. तीनही मतदारसंघांसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणेने अतिशय चोख व्यवस्था पार पाडली. २६८- कणकवलीमध्ये २ लाख २३ हजार ९१० मतदार असून सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ३४ हजार ३९२ मतदारांनी मतदान केले. मतदानाची सरासरी टक्केवारी ६०.०२ टक्के आहे. २६९- कुडाळमध्ये २ लाख ०४ हजार ८०५ मतदार असून एकूण ५८.१७ टक्के, २७०- सावंतवाडीमध्ये २ लाख १९ हजार ०३८ मतदारांपैकी १ लाख १२ हजार ४३१ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ५१.३३ आहे.
एकूण तीनही मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी ६५ टक्के होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी ई. रवींद्रन म्हणाले, २६८- कणकवली मतदारसंघात बिडेवाडी व हरकुळ, तर २६९- कुडाळमध्ये खाजणवाडी येथे, २७०- सावंतवाडी येथे खवणे, झरे, सातार्डा, शिरोडा येथील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाले होते. त्या ठिकाणी तात्काळ नवीन मतदान यंत्रे बदलण्यात आली. मतदान सुरळीत पार पडले. इतर सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे.
जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्था सुरळीत -संजयकुमार बाविस्कर
जिल्ह्य़ात तीनही मतदारसंघांत मतदानादिवशी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणताही अनुचित प्रकार घडला नसून जिल्ह्य़ात सर्वत्र मतदान सुरळीत पार पडले. मतदानादिवशी सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी दिली.
जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ओरोस येथे मतदानाचा हक्कबजावला.
जिल्हाधिकारी,  पोलीस अधीक्षक यांनी मतदान केंद्रांना दिली भेट
जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी ओरोस मतदान केंद्र, ओरोस जिल्हा परिषद शाळा येथे मतदान केंद्राची पाहणी केली, तसेच कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथील मतदान केंद्राची पाहणी करून निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांना सूचना दिल्या. त्यानंतर कलमठ येथील मतदान केंद्राची पाहणी करून निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर घारे यांनादेखील जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व निवडणूक निरीक्षक डॉ. कमल श्रीवास्तव यांनी सूचना दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 4:22 am

Web Title: 65 percent voting in sindhudurg
टॅग : Sindhudurg,Voting
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यातील ८० टक्के मतदान
2 सांगली जिल्ह्य़ात मतदानासाठी चुरशीच्या लढतींमुळे उत्साह
3 शहराच्या मध्यभागात दुपारनंतर गर्दी