महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये ७ हजा ४२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाख ९२ हजार ३०८ इतकी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८६.५ टक्के इतका झाला. मागील २४ तासांमध्ये ८ हजार १५१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २१३ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ९ हजार ५१६ इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

एकूण ८२ लाख ५१ हजार २३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९ हजार ५१६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २४ लाख ३४ हजार ६८७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २३ हजार ४८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. दरम्यान करोनाची बाधा होऊन आत्तापर्यंत एकूण ४२ हजार ४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.