बारावी परीक्षेचा सोलापूर जिल्हय़ाचा निकाल ९३.०६ टक्के इतका लागला आहे. या परीक्षेसाठी सोलापूर जिल्हय़ातून ४१ हजार ५७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ हजार २०९ विद्यार्थी उत्तीर्ण परीक्षा झाले. विशेष गुणवत्तेत २३९९ विद्यार्थी झळकले.
या परीक्षेत १५ हजार २७५ विद्यार्थी प्रथमश्रेणीतून उत्तीर्ण झाले, तर १९ हजार ३७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले. तृतीय श्रेणीत ११५६ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता आले. शास्त्र विभागाचा परीक्षा निकाल ९५.६० टक्के इतका लागला तर वाणिज्य विभागाचा निकाल ९०.०६ टक्के आणि कला विभागाचा निकाल ८१.८० टक्के लागला आहे.
जिल्हय़ात अक्कलकोट तालुक्याचा परीक्षा निकाल ९२.२१ टक्के लागला. तर पंढरपूरचा निकाल ९५.४२ टक्के इतका लागला आहे. करमाळा येथील निकाल ९१.६० टक्के लागला असून, माढा तालुक्याचा निकाल ८७.९५ टक्के एवढा लागला आहे. या तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९३.५६ टक्के आहे.