दहावीच्या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील मुलींनी बाजी मारली असून जिल्ह्याचा निकाल ९२.६१ टक्के लागला आहे. निकालात मुलींचे प्रमाण ९५ टक्के आहे.
सांगली जिल्ह्यातील ५९७ माध्यमिक शाळांतील ४० हजार ३८० विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी बसले होते. त्यापकी ३७ हजार ६२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापकी १७ हजार ७५१ मुली होत्या. त्यापकी १६ हजार ८७७ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.०८ इतके आहे.
तालुका निहाय दहावीच्या निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे – आटपाडी ९३.२६, जत ९२.६१, कडेगांव ९६.९३, कवठेमहांकाळ ९३.७२, खानापूर ९५.५९, मिरज ९३.१९, पलूस ९५.५८, शिराळा ९३.९६, तासगांव ९२, वाळवा ९३.५९ आणि सांगली शहर ९२.४५