रायगड जिल्ह्य़ामध्ये पोलीस पाटलांची ९९१ रिक्त पदे आहेत. ही रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला असून यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. गावनिहाय आरक्षण काढून ही पदे भरली जाणार आहेत. राज्यातील पोलीस पाटील पदे भरतीची प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. रायगड जिल्ह्य़ात सद्य:स्थितीत पोलीस पाटलांची एकूण १८४६ पदे मंजूर असून, त्यापकी ८५५ पदे भरली असून, ९९१ पदे रिक्त आहेत. या पदांबाबत १६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या शासननिर्णयानुसार गावनिहाय आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) व इतर मागासवर्ग-मागास प्रवर्ग या क्रमानुसार आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रवर्गातील पदे आरक्षित करण्यासाठी त्या प्रवर्गाची लोकसख्येची टक्केवारी ही ज्या गावात सर्वात जास्त असेल त्या गावापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने प्रवर्गातील रिक्त पदे पूर्ण होईपर्यंत त्या प्रवर्गासाठी गावे ठरविण्यात येणार आहेत.
तसेच वरीलप्रमाणे प्रत्येक प्रवर्गासाठी ठरविण्यात आलेल्या पदांमधून त्या प्रवर्गासाठी महिला आरक्षणासाठी सोडत काढण्यात येणार आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार केवळ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गाची लोकसंख्या उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाकडील मार्गदर्शक सूचनानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता इतर प्रवर्गातील लोकसंख्येची टक्केवारी निश्चित करण्यासाठी इतर प्रवर्गातील लोकसंख्येची माहिती विहित नमुन्यात ग्रामसेवक व तलाठय़ांमार्फत संयुक्त स्वाक्षरीने घेण्यात येणार आहे.
याप्रमाणे प्रवर्गनिहाय याद्या दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत बनविल्यानंतर त्या याद्या संबंधित गावामध्ये चावडीवर, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
या याद्यांच्या बाबतीत कोणाच्या हरकती असल्यास त्या संबंधित तहसीलदार यांच्याकडे दिनांक २८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत सादर करावयाचा आहे, दिनांक २८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती तहसीलदार यांनी नियमानुसार चौकशी करून त्यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह दिनांक ३ मार्च २०१६ पर्यंत संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत, उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन दिनांक ५ मार्च २०१६ रोजी सदरच्या याद्या अंतिम प्रसिद्ध करावयाच्या आहेत. वरीलप्रमाणे लोकसंख्येची माहिती संकलित करून प्रारूप यादी व प्राप्त हरकतीअंती अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.

Map , Akola district, human chain,
मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?
Kolhapur Election Hatkanangle LokSabha Constituency
उमेदवाराला विजयी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची ‘मिसळ पे चर्चा’; कोल्हापूरसाठी ठरली ‘ही’ रणनीती