News Flash

मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात

कल्याणवरून श्रीवर्धनकडे जाताना मध्यरात्री घडला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल झी ग्रार्डन समोर पुलावरून एक कार (एमएच ०५ इए ५५७६) १५ फुट उंचीवरून खाली पडली. यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत.

कल्याणवरून श्रीवर्धनकडे जाताना मध्यरात्री १.१५ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जखमींना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यापैकी गंभीर जखमी असलेल्यास एमजीएम, पनवेल येथे हलवण्यात आले आहे. संध्या नथू पाटील, प्रीती दत्तू कडवे, राजेश शशिकांत मोरे अशी जखमींची नावं असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 7:54 am

Web Title: a car accident on the mumbai goa highway msr 87
Next Stories
1 संभाजीनगरवर मौन; विकास कामावर बोलणार : आदित्य ठाकरे
2 अर्थव्यवस्थेच्या दुरुस्तीची भावनाच सत्ताधाऱ्यांत नाही!
3 ‘१०८ क्रमांका’ची रुग्णसेवा विविध व्याधींनी ‘बाधित’
Just Now!
X