25 February 2021

News Flash

महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

क्षुल्लक कारणावरुन झाला महेश मांजरेकर यांचा वाद

अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. मांजरेकरांनी मारहाण  केल्यानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकरांविरोधात तक्रार दिली आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणारी काही वाहने एकमेकांना धडकली. यात एक कार महेश मांजरेकरांची होती. कारला धडक बसल्यामुळे मांजरेकर गाडीतून उतरले आणि त्यांनी एका व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर संबंधित व्यक्तीने यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा : प्रियकरासोबत मौनी रॉय बांधणार लग्नगाठ? पाहा कोण आहे तिचा होणारा नवरा

शुक्रवारी रात्री ही व्यक्ती पुण्यावरुन टेंभुर्णीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी यवतच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर एक गाडी ( महेश मांजरेकर यांची) सतत त्यांना ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती. त्यातच सर्वात पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागील सगळ्या गाड्यांना एकमेकांची धडक बसली. यातच मांजरेकर यांच्या गाडीला संबंधित व्यक्तीच्या गाडीची धडक बसली. त्यानंतर मांजरेकर व त्यांचे मित्र गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी या व्यक्तीकडे नुकसानभरपाईची मागणी केली. तसंच त्यांनी या व्यक्तीला मारहाणही केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 9:36 am

Web Title: a non cognizable offence has been registered at yavat police station in pune against actor mahesh manjrekar ssj 93
Next Stories
1 धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उद्यापासून राज्यभरात आंदोलन
2 लसीकरण स्थगित केल्याचं ‘ते’ वृत्त चुकीचं; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
3 …पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत; संजय राऊतांचा काँग्रेसला चिमटा
Just Now!
X