वर्धा येथील उच्चभ्रू वसाहतीमधील एक 63 वर्षीय व्यक्ती सिंकदराबाद येथे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना विलगिकरणात ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आजपर्यंत वर्धा येथे एकही व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आला नव्हता, करोना संसर्गास रोखण्यास येथील प्रशासनास यश आले होते. मात्र आज वर्धा येथील एक जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन खबरदारीचे उपाय तत्काळ अंवलंवबण्यास सुरूवात केली आहे.

सिकंदराबाद येथील रुग्णालयाने ही व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याचे आज दुपारी कळविल्यानंतर आरोग्य विभागाने त्या व्यक्तीच्या निकटच्या दहा जणांना रुग्णालयात हलविले, त्यांचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले.ही व्यक्ती लिव्हरच्या शस्त्रक्रियेसाठी सिकंदराबादला 15 मे रोजी गेली होती. या दहा दिवसांमध्ये ही व्यक्ती किती जणांच्या संपर्कात आली याची माहिती घेतली जात आहे.शिवाय, तो पूर्वीच बाधित होता की बाहेरगावी गेल्यावर त्याल करोनाची बाधा झाली हे देखील पाहिले जात आहे. कारण आजपर्यंत वर्धेत एकही रुग्ण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंतचे सर्व 12 रुग्ण हे बाहेरून आलेले व आर्वीतील एक मृत्यू झालेला आहे.

आणखी वाचा- धक्कादायक : औरंगाबादमध्ये नऊ तासांत पाच करोनाबाधितांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे आता या रुग्णाची नोंद वर्धा की सिकंदराबादची करायची.याचाही तिढा आहेच. तरी  खबरदारी म्हणून या व्यक्तीचा निवासी व घरा लगतचा परिसर प्रतिबंधित करणे सुरू केले असून तपासण्या देखील होणार असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवर यांनी सांगितले आहे.