15 December 2019

News Flash

क्रिकेट सामन्यादरम्यान तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वसीमला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाला

(संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट सामन्यादरम्यान तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. वसीम अजीज मुलाणी असं या ३२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हिंजवडी परिसरातील कासारसाई येथील क्रिकेट मैदानावर वसीम काम करत असलेल्या कंपनीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. सायंकाळी चारच्या सुमारास स्पर्धेचा शेवटचा क्रिकेट सामना सुरू होता. वसीम फलंदाजी करून झाल्यानंतर मैदानात एका बाजूला बसला होता. क्रिकेट सामना सुरु असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला.

मैदानात रुग्णवाहिका आणि डॉक्टर होते. त्यांनी वसीमला तातडीने वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृत्यूचे कारण स्पष्ट होत नव्हते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असता मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले.

First Published on February 11, 2019 1:37 pm

Web Title: a youngster dies of heart attack in pimpri chinchwad
Just Now!
X