28 November 2020

News Flash

पुण्यात बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात, ६ जण जखमी

बसनं तीन दुचाकी आणि एका कारला दिली धडक . 

ब्रेक निकामी झाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. यामध्ये सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. निगडीहून वडगाव मावळला बस निघाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक एम एच-१२ इक्यू- ३१९० ही १५ ते २० प्रवाशी घेऊन निगडीवरून वडगावमावळ येथे जात होती. त्यावेळी देहूरोड येथील पुल उतरताना बसचा ब्रेक फेल झाला. डाव्या बाजूस खड्डा असल्यामुळे चालकाने उजव्या बाजूला सुरू असलेल्या पुलाच्या भिंतीला घासून बस घेतली. तेव्हा समोरच्या तीन दुचाकी आणि एका चार चाकी वाहनाला बसने जोरदार धडक दिली. दुचाकीवरील एकाचा बसच्या चाकाखाली पाय आल्याने त्याचा पाय निकामी झाला आहे. तर इतर ५ ते ६ जण जखमी झाले आहेत.

चालकानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला. अन्यथा एखाद्याच्या जीवावर हा अपघात बेतण्याची शक्यता होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 3:09 pm

Web Title: accident due to break fail of pmpl six injured
Next Stories
1 पुण्याचा पारा सलग चौथ्या दिवशी ३८ अंशांवर!
2 स्मार्ट सायकल योजनेतील तांत्रिक धोके उघडकीस
3 महागडय़ा सायकलींवर चोरटय़ांचा डोळा
Just Now!
X