26 September 2020

News Flash

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात अनर्थ टळला

आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोल्हापूरच्या माळरानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आदित्य ठाकरे  (संग्रहित छायाचित्र)

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात बुधवारी अनर्थ टळला. आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमादरम्यान वाऱ्यामुळे मंडपाचे किरकोळ नुकसान झाले.आदित्य ठाकरे आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व जण सुखरुप आहेत.

आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोल्हापूरच्या माळरानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणही देण्यात आले. कार्यक्रम सुरु असताना वादळी वाऱ्याने मंडप उडाले. तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मंडपाचे खांब पकडले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने मंडप खाली कोसळले नसून या अपघातात आदित्य ठाकरे बचावले आहेत. आदित्य ठाकरे आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यार्थी सुखरुप असल्याचे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:27 pm

Web Title: aditya thackeray stage collapse in high wind in kolhapur
Next Stories
1 PHOTOS: विठ्ठलाच्या पंढरीत धुक्याची दुलई
2 VIDEO: पुण्यात कोंबड्याच्या खुराड्यात घुसला बिबट्या आणि…
3 अकोल्यात इमारत कोसळली, महिला ठार ; 3 जखमी
Just Now!
X