News Flash

‘वारीत साप सोडणार’ हे संभाषण कोणाचे ते उघड करा-अजित पवार

संभाषण झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता त्याचे पुरावे अजित पवारांनी मागितले आहेत

अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले नाहीत. मराठा समाजाने त्यांना आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय विठ्ठलाची पूजा करू देणार नाही असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारीत साप सोडण्याचा डाव असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. असे काही संभाषण मराठा बांधवांनी केले असेल यावर आपला विश्वास नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच असे काही संभाषण असल्याचा दावा जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत तर हे संभाषण सार्वजनिक करावे असेही आव्हान अजित पवार यांनी दिले आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे आव्हान दिले.

आज होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला मी आणि धनंजय मुंडे जाणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुण्यात एका कार्यक्रमासाठी अजित पवार हे आले होते.त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर भूमिका मांडली. राज्यात आठवड्याभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे.या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहे.काही ठिकाणी जाळपोळी च्या घटना घडल्या आहेत. तर आंदोलना दरम्यान तिघांचा मृत्यू देखील झाला आहे.या सर्व घडामोडी लक्षात घेता.आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्ष गटनेत्याची बैठक घेतली जाणार आहे.आता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 12:08 pm

Web Title: ajit pawar criticized cm devendra fadnavis on his statement
Next Stories
1 हा गुरूजी गरळ ओकतो, संभाजी भिडेंवर अजित पवारांची आगपाखड
2 पुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला, दीड कोटींचे हिरे चोरीला
3 पुणे स्टेशनच्या परिसरात दीड कोटींच्या दागिन्यांची लूट
Just Now!
X