राज्यात आज ३ हजार २५४ करोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. याचबरोबर एकूण संख्या आता ९४ हजार ४१ वर पोहचली आहे. आज नवीन १ हजार ८७९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४४ हजार ५१७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सद्य स्थितीस राज्यात एकूण ४६ हजार ७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी ही माहिती दिली आहे.

पुण्यात आज दिवसभरात नव्याने ३०४ नवे करोना रुग्ण आढळल्याने, शहारातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार ५०९ झाली आहे. तर आज दिवसभरात तीन रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४०६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर आज करोनावर उपचार घेणार्‍या २७१ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत ५ हजार ५७५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

तर, पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक ७८ करोना बाधित रुग्ण आढळले असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. शहरातील बाधितांची एकूण संख्या ९२१ वर पोहचली आहे. यापैकी आज २५ जणांना घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत ५०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आज उपचारादरम्यान ८५ वर्षीय वृद्ध पुरुषाचा आणि ६८ वृद्ध महिलेचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.