औरंगाबादमधील घारदाेन येथे दाेन कुटुंबांमध्ये शेतीतील रस्त्यावरून वाद झाला. शनिवारी रात्री झालेल्या मारहाणीत एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. आराेपींना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणा नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. याप्रकरणी चार महिलांसह १२ जणांविराेधात चिकलठाणा पाेलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीनंतर जखमी झालेले माणिकराव दादा नवपुते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती चिकलठाणा पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.

याप्रकरणाविषयी पाेलिसांनी सांगितले की, आराेपी व फिर्यादी यांच्यात शेतीतील येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून वाद आहे. शनिवारी फिर्यादीने रस्त्यावरून ट्रॅक्टर घातल्याच्या कारणावरून भांडण झाले. या वादाचे रुपांतर गंभीर हाणामारीत झाले. यामध्ये माणिकराव नवपुते हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर उपविभागीय पाेलीस अधिकारी विशाल मेहूल, सहायक पाेलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, अंमलदार करंगळे आदीनी भेट देऊन पंचनामा केला.

इगतपूरी : रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; फिल्म इंडस्ट्रीतील ४ महिलांचा समावेश

याप्रकरणी गाेरख माणिकराव नवपुते यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रवी श्रीराम नवपुते, अमाेल बद्रिनाथ नवपुते, हरी बाबूराव नवपुते, भास्कर भुजंगराव नवपुते, राम बाबूराव नवपुते, बद्रीनाथ जनार्दन नवपुते, बाबूराव भुजंगराव नवपुते, श्रीराम जनार्दन नवपुते, यांच्यासह चार महिलांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.