परजिल्ह्यातून आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे आजवर दिसत होते. परंतु आता स्थानिकही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मंगळवारी आणखी 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा भागात 12 जण तर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ते पुणे येथून जिल्ह्यात परतलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 137 वर गेली आहे.

उस्मानाबाद शहरात कोरोनाच विळखा अधिक घट्ट होत असून उस्मानपुरा भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरवासियांमध्ये घबराट पसरली आहे. त्यातच मंगळवारी उस्मानपुरा येथील आणखी 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे दोघेजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असल्याचे दिसत आहे. मंगळवारी 54 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 6 जणाांचे अहवाल संदिग्ध आहेत. तर 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्यांना कोरोनाची लागण असल्याचे आतापर्यंत दिसत होते. परंंतु त्यांच्या संपर्कात आलेले स्थानिकही आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे आता अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 137 वर पोहचली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 58 जणांवर उपचार सुरू असून 76 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.