News Flash

अत्याचाराच्या तिसऱ्या गुन्ह्य़ात लक्ष्मण मानेंना अटक

सहा महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्य़ात पोलिसांच्या ताब्यात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना आज तिसऱ्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांना

| April 24, 2013 04:18 am

सहा महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्य़ात पोलिसांच्या ताब्यात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना आज तिसऱ्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली. त्यांना जिल्हा न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नऊ एप्रिल रोजी पोलिसांना शरण आल्यानंतर लक्ष्मण माने यांची दोन बलात्काराच्या गुन्ह्य़ात चौकशी झाली आहे. त्यांना दोन गुन्ह्य़ात वेगवेगळी पोलीस कोठडी देण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते. सोमवारी त्यांना तिसऱ्या गुन्ह्य़ात ताब्यात घेण्यात आले होते. आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
माने यांच्याविरुद्ध ते स्वत: कार्याध्यक्ष असलेल्या शारदाबाई पवार आश्रमशाळेतील तब्बल सहा महिलांनी लैंगीक छळाची तक्रार दाखल केलेली आहे. यानुसार त्यांच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल केले असून प्रत्येक गुन्ह्य़ात त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2013 4:18 am

Web Title: arrest to laxman mane for third case
टॅग : Arrest,Laxman Mane
Next Stories
1 मानव-वन्यजीव संघर्षांवरून ताडोबात राजकीय रणधुमाळी
2 बफर झोनमधील पाणवठय़ांकडे वन अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष
3 जायकवाडीमध्ये ४८ तासात पुरेसे पाणी सोडा!
Just Now!
X