27 September 2020

News Flash

सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत

एडलवाइज कंपनीतर्फे ५० लाखांची मदत

प्रातिनिधीक छायाचित्र

सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर एडलवाइज कंपनीतर्फे ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनेकांनी सढळ हातांनी केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या स्वतंत्र खात्यात आतापर्यंत २५१ कोटी रुपये जमा झाले आहेत.

दाऊदी बोहरा समाजाच्यावतीने देशभरात विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आतापर्यंत ८ लाख ३३ हजार २४३ लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचे ट्रस्टने म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करताना सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोना विषाणुच्या संकटावर नक्कीच मात करू असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 1:04 pm

Web Title: assistance of rs 2 crore for chief ministers assistance fund on behalf of syedna burhani trust aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 चिमुकल्यांसाठी स्पर्धा : घरी बसून होऊ शकता सहभागी
2 बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम,गरिबांना अवघ्या दोन रूपयांत जेवण
3 Video: “तुम्ही सीपी असाल तर आम्ही पण इथले…”; विश्वास नांगरे पाटील यांना ऐकावे लागेल ‘ते’ आदेश
Just Now!
X