27 May 2020

News Flash

करोनाचे सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्यसेविकांवर नगरमध्ये हल्ले

मुकुंदनगर परिसर सील

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर शहरातील मुकुंदनगर परिसर सील करण्यात आला असून या भागात घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. साथीचे सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्यसेविकांच्या अंगावर धावून जाऊन दमदाटी केली म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याची ५३ व्यक्तींची तपासणी केली असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

परदेशातून आलेल्या दोन करोनाबाधित व्यक्तींनी जामखेड तसेच नगर शहरातील मुकुंदनगर भागात अनेक ठिकाणी वास्तव्य केल्याचे उघडकीला आलेले आहे. भागातील नऊ ते दहा जणांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेले आहे. त्यांच्या संपर्कात कोण आले याची माहिती संकलित केली जात आहे. मुकुंदनगर भागातील रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी यांनी मुकुंदनगर भागात आज स्वत: उपाययोजनांची पाहणी केली.

मुकुंदनगर परिसरात माहिती संकलित करीत असलेल्या आरोग्यसेविकांना आज  सकाळी काही नागरिकांनी दमदाटी करून त्यांच्या अंगावर धावून गेले. या घटनेची पोलिसांनी तत्काळ दखल घेत भिंगार छावणी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून दोन गुन्ह्यंची नोंद करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्यसेविकांनी मुकुंदनगर परिसरात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. काही नागरिक मात्र आरोग्यसेविकांना माहिती देत नसून त्यांनाच दमदाटी करीत आहेत. काही ठिकाणी माहिती विचारण्यास गेल्यानंतर या आरोग्यसेविकांना दमदाटी करत त्यांच्याकडील नोंदणी पुस्तक फाडून टाकले. काहींनी दरवाजे लावून घेतले तर काही थेट अंगावर धावून आले. अशा तक्रारी आरोग्यसेविकांनी केल्या आहेत. या घटनांनंतर पोलीस ठाण्यात  गुन्हे दाखल झाले. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी भेट देऊन माहिती घेतली. सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्यसेविकांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे.असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बारामती येथील करोनाबाधित व्यक्तीच्या श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन जण संपर्कात आले होते. त्यांचीही सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.या तीनही व्यक्ती शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्या वेळी या करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात ते आले होते.

नगर-औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव येथे एका बँकेच्या एटीएम मशीनच्या रखवालदारास तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

हल्लय़ांच्या प्रकारात वाढ

करोना सर्वेक्षण करणाऱ्यावर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहे. मुकुंदनगर भागात आज तीन हल्ले झाले. तर कोपरगावला एक हल्ला झाला. या प्रकरणी चार गुन्हे नोंदविण्यात आले. आज श्रीरामपूर शहरात पोलिसांनी अनेकांना चोप दिला. काही दुचाकी व मोटारीच्या काचा फोडल्या. एका पत्रकाराच्या दुचाकीची मोडतोड केली.

नऊ जणांचे अहवाल नकारात्मक

प्रदेशातील दोघा करोना बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्या आलेल्या नऊ व्यक्तीचे तपासणी अहवाल नकारात्मक आले.   आणखी एकूण २३ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल नकारात्मक आले आहे.दरम्यान नेवासे, संगमनेर आणि राहुरीमधून  एकूण ५२ व्यक्ती घेतल्या ताब्यात ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेची दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:37 am

Web Title: attack on health worker survey of the corona in nagar abn 97
Next Stories
1 गोंदियातील आरोग्य सेविकांचा ‘कोविड १९’ प्रशिक्षणास नकार
2 राज्यमंत्री बच्चू कडू यांचे घरीच विलगीकरण
3 चीनवर संपूर्ण जगाने बहिष्कार टाकावा – भिडे गुरुजी
Just Now!
X