News Flash

वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठवले

मात्र सहा वर्षापासून पंकजा मुंडे यांच्याकडे कारखान्याची सूत्रे आल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी हा कारखाना चर्चेत आहे.

बीड :  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकवल्यामुळे विभागीय निधी कार्यालयाने कारखान्याचे बँक खाते गोठवून काही रक्कम वसूल केली आहे. शेतक ऱ्यांच्या उसाला किमान मूलभूत दर कमी दिल्याप्रकरणानंतर कर्मचा?ऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबतही कारखान्यावर कारवाई झाल्याने कारखान्याच्या कारभारावर प्रश्?नचिन्ह उभे राहिले आहे. तर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी कोणतेही खाते गोठवण्यात आले नसून केवळ राजकीय खोडसाळपणातून वृत्त दिले जात असल्याचा आरोप करत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

परळी जवळील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना काही वर्षापूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आशिया खंडात विविध विक्रमाने नावलौकिकाला आला होता.

शेतक ऱ्यांना एफआरपीनुसार आधारभूत किमतीनुसार ऊसदर दिला नसल्यामुळे कारखान्यावर साखर आयुक्तांनी नोटीस बजावली होती. तर आता औरंगाबाद भविष्य निधी कार्यालयाने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची १ कोटी ४६ लाख रुपये रक्कम भरली नसल्याने अनेकवेळा नोटिसा बजावल्या. मात्र पैसे जमा न केल्याने बँकेचे खाते जप्त करून ९२ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कारखान्यावर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी माध्यमांना दिली. मात्र, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.पी.एस.दीक्षितुलू यांनी दुष्काळ व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीत असून अशा परिस्थितीत कोणतीही कार्यवाही झालेली नसताना खोडसाळपणाने वृत्त दिले जात असल्याचा आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:01 am

Web Title: bank account of vaidyanath sugar factory bjp akp 94
Next Stories
1 दहावीच्या परीक्षेत सालाबादप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल
2 Corona Update : राज्यात नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण जवळपास दुप्पट! रिकव्हरी रेट ९६.२७ टक्के
3 जळगावमध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळलं; वैमानिकाचा मृत्यू, एक जखमी
Just Now!
X