करोनामुळे अनेक जण आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवत आहे. अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळत आहे. अनेकांच्या डोक्यावरील छत्र हरपत असल्याने रोजच्या जगणाच्या प्रश्न उभा राहिला आहे. अशात बारामतीत मुढाले गावात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. मरणाच्या दारात गेलेल्या ७६ वर्षीय आजीने डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

७६ वर्षीय आजींना काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खालावल्याने १० मे रोजी त्यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचं ठरवण्यात आलं. आजीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईक गाडीतून नेत होते, तेव्हा ७६ वर्षीय आजीची प्रकृती खालावली त्यांनी प्रतिसाद देणं बंद केलं. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना देवाज्ञा झाल्याचं गृहीत धरलं. त्यानंतर त्यांनी आजी गेल्याचं नातेवाईकांना कळवलं आणि अंतिम संस्काराची तयारी सुरु केली. आजी गेल्याने घरातल्या महिलांनी हंबरडा फोडला आणि आजीने डोळे उघडले. त्यानंतर आश्चर्यचकीत झालेल्या नातेवाईकांनी तात्काळ आजीला रुग्णालयात दाखल केलं. तसेच आजी जिवंत असल्याचं नातेवाईकांना कळवलं.

मिझोरममधील करोनाबाधित मंत्र्याची रुग्णालयात सेवा; रुग्णालयात लादी साफ करतानाचा फोटो व्हायरल

शकुंतला गायकवाड यांना बारामतीतील सिल्व्हर जुबली रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुधले गावात अशी घटना घडल्याचं पोलिसांनीही कबुली दिली आहे.