संगमनेर येथून कसारा येथे जाणा-या बसला बारी घाटात अपघात झाला. बसमध्ये बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने ही बस पुलाच्या कठड्यावर चढली. संगमनेर आगाराची ही बस पुलाच्या कठड्यावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत वृत्त असे की, संगमनेर – कसारा नियमित चालणारी बस ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. घाटात आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव वेगाने जाणारी ही बस पुलाचा कठडा तोडून त्याच ठिकाणी अडकून बंद पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी अकोले आगारातील बसला अपघात झाला होता. आज घडलेल्या या घटनेत ही बस कठडा तोडून दरीत कोसळली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही आणि सर्व प्रवासी बचावले.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग