परवानगी नसतानाही शहरात सर्रास होतेय विक्री; मूत्रपिंडासह यकृतावर गंभीर परिणामाची शक्यता

नागपूर : सुद्ढ शरीर कमावण्यासाठी तरुणाईची सारखी धडपड सुरू असते. त्यासाठी अनेक जण जिमचा रस्ता धरतात. कमी वेळात दणकट शरीरयष्टी प्राप्त करायची असेल तर प्रोटीन पावडर (सप्लिमेंट) हा उत्तम पर्याय असल्याचे जिम प्रशिक्षक सांगतात आणि अनेक तरुण डोळे बंद करून या प्रोटीन पावडरचे नियमित सेवन सुरू करतात, परंतु हे पावडर खायला सांगणारे डॉक्टर नसल्याने व पावडरमधील अनेक घटक अपायकारक असल्याने त्याचा मूत्रपिंड, यकृत व शरीराच्या इतरही अवयवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

उपराजधानीतील तरुणांसह इतरही वयोगटातील अनेक जण जिममध्ये जात आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षक प्रोटीन पावडर खाण्याचा सल्ला देतो. त्यासाठी नियम धाब्यावर बसवून १,५०० ते ७,००० रुपयांपर्यंतच्या किमतीचे वेगवेगळे प्रोटीन पावडर उपलब्ध करून दिले जातात.  खरे तर हे प्रोटीन पावडर प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या तुलनेत डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांच्या  सल्ल्यानंतरच देणे अपेक्षित आहे, परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. या पावडरचे दुष्परिणाम काही दिवसांनी समोर यायला लागतात. जिममध्ये प्रोटीन पावडर विकण्यासाठी तेथील प्रशिक्षकाला विशिष्ट लक्ष्य निश्चित करून दिले जाते. या प्रशिक्षकाने त्याहून जास्त पावडरची विक्री केल्यास त्याला विशेष इन्सेन्टिव्हही दिले जातात. त्यामुळे जास्त पैसे कमावण्यासाठी हा प्रशिक्षक डॉक्टर आणि आहार तज्ज्ञांच्या थाटात प्रत्येक उमेदवाराला प्रोटीन पावडरचे महत्त्व चुकीच्या पद्धतीने सांगून ते खाण्यासाठी प्रोत्साहित करतो.

एफडीएच्या कारवाईनंतर नवीन पळवाट

अन्न व औषध प्रशासन विभागाने जून- २०१७ मध्ये शहरातील काही जिमवर छापा मारला होता. यावेळी बऱ्याच जिममध्ये न्यूट्रास्युटिकल, हेल्थ सप्लिमेंट, फूड सप्लिमेंट नियमबाह्य़पणे दिले जात असल्याचे पुढे आले होते. याप्रकरणी काहींवर कारवाईही करण्यात आली. त्यानंतर या जिम चालकांनी पावडर विक्रीची पद्धत बदलली. आता ते  प्रोटीन पावडरचे ऑर्डर मिळताच बाहेर संबंधिताला पैसे देऊन ते मागवून घेतात. विशेष म्हणजे, या खरेदीचे देयकही दिले जात नाही.

योग्य कारवाई करणार

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमबाह्य़ प्रोटीन पावडर विक्री करणाऱ्यांवर नित्याने कारवाई केली जाते. या प्रकारच्या कुणाकडून तक्रारी नाहीत, परंतु प्रकरणाचे गांभीर्य बघत चौकशी केली जाईल. नागरिकांनीही हा प्रकार आढळताच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार  करावी. तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवून संबंधितांवर कारवाई केली जाईल.’’

– डॉ. राकेश तिरपुडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग (औषध), नागपूर.

पावडर आरोग्याला अपायकारकच

मी प्रत्येक रुग्णास प्रोटीन पावडरचे सेवन त्वरित थांबवण्याचा सल्ला देतो. पावडरमुळे शरीरातील काबरेहायड्रेट्स व लोहाचे प्रमाण कमी-जास्त होऊन मूत्रखडा, डायरिया होण्याची शक्यता बळावते. हाडे ठिसूळ बनतात. डासांच्या जॉईंटवर युटिक अ‍ॅसिड जमा होऊन दुखणे वाढते. क्षमतेहून जास्त प्रोटीन पावडर घेणाऱ्याच्या मूत्रपिंडासह यकृत व शरीराच्या इतरही अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

– डॉ. प्रशांत राठी,

माजी सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर.

पाच वर्षांत दीड कोटींवर उलाढाल

पाच वर्षांपूर्वी शहरात प्रोटीन पावडरची उलाढाल सुमारे २५ लाखांच्या जवळपास  होती. आता ती दीड कोटींवर गेली आहे. याहून जास्त उलाढाल ऑनलाईन पद्धतीने खरेदी-विक्री करून होते. हे पावडर औषधांच्या दुकानातूनच विक्री व्हायला हवे, परंतु काही व्यावसायिक चुकीच्या पद्धतीने ते थेट ग्राहकांना विकतात. त्याकरिता देयके किरकोळ औषध दुकानदारांच्या नावाने फाडून पळवाट शोधली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

– हरीश गणेशानी, सदस्य, महाराष्ट्र केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन, नागपूर

२०० रुग्णांची  वर्षांला नोंद

धरमपेठ येथील राठी रुग्णालयाच्या अभ्यासानुसार, त्यांच्याकडे वर्षांला येणाऱ्या ८,००० रुग्णांपैकी सुमारे २०० रुग्ण हे विविध जिममध्ये चुकीचे प्रोटीन पावडर खाल्ल्यामुळे वेगवेगळी व्याधी घेऊन येतात. शहरातील इतरही रुग्णालयांत जवळपास अशीच स्थिती असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.