28 February 2021

News Flash

लोकमान्य टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाचे जनक – पुणे महापालिका

मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन वाद सुरु आहे.

मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन वाद सुरु आहे. आता पुणे महानगरपालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला असे म्हटले आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम १८९२ साली पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली अशी माहिती पुणे महापालिकेने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.

महापौर मुक्ता टिळक यांना याबाबत विचारले असता. त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर अशा प्रकारचा उल्लेख नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब रंगारी मंडळाचे विश्वस्त सूरज रेणुसे म्हणाले की, भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्याचे अनेक कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे, तरी देखील सत्ताधारी पक्ष मान्य करण्यास तयार नव्हता.

पुणे महापालिका आणि सताधारी भाजपच्या निर्णयाविरोधात त्यांनी उपोषण केले आणि न्यायालयात धाव देखील घ्यावी लागली. मात्र अखेर आज महापालिकेच्या वेबसाईटवर भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केल्याचा उल्लेख असल्याने त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. पुणे महापालिका प्रशासन आणि सताधारी भाजपच्या वतीने गतवर्षी सर्वाजनिक गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात आले होते. त्याला भाऊसाहेब रंगारीच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 10:22 pm

Web Title: bhausaheb rangari first started ganeshutsav in pune
Next Stories
1 पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे
2 प्रमोशनसाठी अनधिकृत स्टेज शो करणाऱ्या मोबाइल दुकानांविरोधात मनसेचे खळ्ळखटॅक
3 पिंपरीत आरटीओ अधिकाऱ्याला फासले काळे
Just Now!
X