News Flash

अरण्यऋषींचा ९० वा वाढदिवस साजरा; पक्षी सप्ताहास प्रारंभ

मारुती चितमपल्लींची ग्रंथसंपदा आजही अनेकांसाठी मार्गदर्शक

‘अरण्यऋषी’ मारूती चितमपल्ली यांचा वाढदिवस सोलापुरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शासनाच्यावतीने पक्षी सप्ताहास प्रारंभ करण्यात आला आहे. मूळचे सोलापूरचे असलेले मारूती चितमपल्ली यांनी वन खात्यातील नोकरीच्या निमित्ताने विदर्भातील जंगलात अनेक दशके राहून प्राणी, पक्षी, वृक्षांचा अभ्यास केला. प्राणी-पक्ष्यांसह निसर्गाचा अभ्यास करून त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी चितमपल्ली हे विदर्भातून सोलापुरात परतले आहेत.

त्यानुसार गुरूवारी सकाळी शहरातील विजापूर रस्त्यावर सिध्देश्वर वनविहारात मारूती चितमपल्ली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक सुजय डोडल व वन संरक्षक रमेश कुमार, धैर्यशील पाटील यांच्यासह वनाधिकारी सुवर्णा माने, बाबा हाके आदी उपस्थित होते. यावेळी अनोखा निसर्ग केक चितमपल्ली यांनी कापला.

अक्कलकोट रस्त्यावरील स्वतःच्या चुलत्याच्या निवासस्थानी चितमपल्ली वास्तव्यास आहेत. तेथे दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची वर्दळ होती. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी खासदार धर्मण्णा सादूल, दत्तात्रेय सुरवसे, ॲड. जे. जे. कुलकर्णी आदींनी चितमपल्ली यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 6:41 pm

Web Title: bird and nature lover maruti chitampalli celebrate his 90th birthday in solapur psd 91
Next Stories
1 “शिवसेना खासदारावर कारवाई करून आम्हालाही नाईक कुटुंबीयाप्रमाणे न्याय द्या”; उद्धव ठाकरेंकडे मागणी
2 दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू
3 अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या : देवेंद्र फडणवीस
Just Now!
X