News Flash

कोल्हापूर: भाजपाने साजरा केला मोदींचा वाढिदवस, विरोधकांनी केलं भीक मागो आंदोलन

विरोधकांनी केलं भीक मागो आंदोलन

भाजपाने मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आज जिल्हा कार्यालय येथे मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. करोना काळात करण्यात आलेल्या सेवा कार्यासंबंधी ई-पुस्तिकेचे उद्घाटनही करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपरोधिक वाढदिवस साजरा

देशाला बेरोजगार मुक्त करण्याच्या घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उपरोधिक वाढदिवस साजरा करत आज अखिल भारतीय नौजवान संघाच्यावतीने निषेध केला. भीक मांगो आंदोलन करत मोदी कार्यपद्धतीवर जोरदार टीका करीत मोदी आणि भाजप विरोधी घोषणा देऊन बिंदू चौक परिसर दणाणून सोडला. आंदोलनात गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

एनएसयुआयचे आंदोलन

मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर ‘बेरोजगार दिवस’ साजरा करण्यात आला. कोल्हापूर शहर एनएसयुआयच्यावतीने मिरजकर तिकटी चौक येथे भीक मागो आंदोलन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 11:43 pm

Web Title: bjp celebrated birthday of pm modi congresss ncp did agitation in kolhapur scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण, ३९८ मृत्यू
2 करोनापासून रक्षणासाठी पानठेले बंद करा, डॉ. अभय बंग यांचं आवाहन
3 कोल्हापूर : करोना रुग्ण महिलेचे अडीच लाखांचे दागिने चोरीला
Just Now!
X