मुंबईतील माहीमध्ये काल भाजपा विधासभा कार्यलायाबाहेर झालेल्या पक्षाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. तर याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तर, भाजपा आमदारांच्या या टीकेला आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यांनी भाजपा आमदार नितेश राणेंवर निशाणा साधल्यानंतर आता नितेश राणेंनी देखील त्यांच्यावर थेट पलटवार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एकदम बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे.. पण..त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या “कलानगरातून” करा..जेणेकरून रोज संध्याकाळी DINO च्या घरी होणारे कार्यक्रम एकदाचेच संपतील..!!!” असं नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

“ त्यांना वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर तेही करू”

तसेच, “नशामुक्त महाराष्ट्र बरोबर “महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र” हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे..जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर सारख्या महिलांना न्याय भेटेल! बरोबर ना राऊत साहेब?” असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे.

…मी हे देखील म्हटलं होतं, अरे ला करे करायची आमची तयारी आहे – प्रसाद लाड

“शिवसेना भवन हे आता कलेक्शन सेंटर झाले आहे”, अशी टीका नितेश राणेंनी काल केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी आज सकाळी संजय राऊतांना विचारलं होतं तेव्हा त्यांनी “काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागली असेल, असं मी वाचलं कुठेतरी. या सगळ्या विषयांवर आम्ही बोलण्यापेक्षा आमचे स्थानिक शाखाप्रमुख बोलतील. हा शाखाप्रमुखांच्या स्तरावरचा विषय आहे. कोण आहेत नितेश राणे? सोडून द्या”, अशा खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.

“काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय”, संजय राऊतांचा नितेश राणेंना खोचक टोला

“महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालों को इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचं ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसं समजणार?” असं ट्विट देखील संजय राऊत यांनी प्रसाद लाड व नितेश राणे यांच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर केलंलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla nitesh rane targets shiv sena leader sanjay raut msr
First published on: 01-08-2021 at 18:58 IST