News Flash

पालघरमध्ये बंद घरात सापडला आई व मुलीचा मृतदेह

मृत महिला आपल्या पहिल्या पतीला सोडून छाया निवास येथे दुसऱ्या इसमा सोबत राहत होती

(संग्रहित छायाचित्र)

पालघर तालुक्यातील पास्थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या छाया निवास येथे एका सदनिकेत दोन महिलांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी तारापूर पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी दरवाजा उघडताच कुजलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळले. त्यानंतर संपूर्ण इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती.

तारापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पास्थळ येथील छाया निवास रहिवासी संकुलात एक 48 वर्षीय महिला तिच्या 20 वर्षीय मुलीसोबत आपल्या दुसऱ्या पती सोबत राहत होती. मात्र घरातून अचानक दुर्गंधी येवू लागल्याने नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी तारापूर पोलीसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी तारापूर पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी या बंद घरात महिला व तिची मुलगी यांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले. तारापूर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदना साठी तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले असून अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कसा झाला याचा उलघडा होणार असल्याची माहिती दिली.

मृत महिला आपल्या पहिल्या पतीला सोडून छाया निवास येथे दुसऱ्या इसमा सोबत राहत होती. संकुलात असलेल्या सिसीटिव्ही नुसार 6 डिसेंबर  रोजी ही घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच महिलेचा दुसरा पती गेल्या चार पाच दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येत असून तारापूर पोलिसांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत तारापूर पोलीस अधिक तपास करत असून फरार असलेल्या पतीचा शोध घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2020 10:52 pm

Web Title: bodies of mother and daughter were found in a locked house in palghar abn 97
Next Stories
1 कंसालाही लाजवेल इतका अहंकार रावसाहेब दानवेंना आहे-हर्षवर्धन जाधव
2 “ठाकरे सरकारचा एक निर्णय आणि राज्यातील सर्व शाळांमधली हजारो शिपाई पदं धोक्यात”
3 शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X