01 October 2020

News Flash

CAA: आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींना घातली शिवी आणि त्यानंतर…

परभणीच्या पाथरीत हे आंदोलन सुरु होतं

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणं एका आंदोलनकर्त्याला महागात पडलं आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्याला अटक केली आहे. परभणीच्या पाथरीत हे आंदोलन सुरु होतं. याच आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदींना शिवी देण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्षाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आंदोलनकर्त्याला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्याचं नाव शेख गणी शेख रहमान असं आहे. परभरणीत पाथरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असताना रहमान यांनी जाणुनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. व्हिडीओचा आधार घेऊन भाजप शहराचे जिल्हाध्यक्षांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी पंतप्रधानांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला तसंच अटकही केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 11:11 am

Web Title: caa protest abusive language against pm narendra modi in parbhani sgy 87
Next Stories
1 महाबळेश्वरमध्ये सात जनावरांचा विषबाधेने मृत्यू
2 महाराष्ट्राच्या क्रीडामंत्र्याच्या पत्नीचे पैसे चोरले आणि…
3 “रोहित पवार यांच्याकडं बघा, त्यांच्यासारखं धाडस केलं पाहिजे”; अजित काकांकडून कौतुक
Just Now!
X