News Flash

रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पोलिसांना बसण्यासाठी मिळाली खुर्ची

शरद पवारांनी यासंदर्भातली अपेक्षा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती

एखाद्या बड्या नेत्याचं भाषण म्हटलं की पोलीस हे कायम उभे असलेले दिसून येतात. त्यांचे कर्तव्यच ते बजावत असतात. मात्र साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात वेगळं चित्र पाहण्यास मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार बोलत होते. त्यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महिला पोलीस खुर्चीवर बसले होते. कारण त्यांच्यासाठी ती आसनव्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांना सार्वजनिक कार्यक्रमावेळी बसायला खुर्ची मिळावी अशी अपेक्षा शरद पवार यांनीच व्यक्त केली होती. ज्यानंतर आज रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात पोलिसांना खास आदेश देऊन खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या.

पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतेच कळविले होते. आज शरद पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. प्रामुख्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे पवार यांचे म्हणणे होते.

जेव्हा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचं आगमन होतं तेव्हा पोलीस प्रशासनावर जास्त ताण येतो. सभा शांततेत सुरु असूनही   व्यक्तींच्या आगमन, प्रस्थान व सभेच्यावेळी पोलिस प्रशासनावर विशिष्ट ताण येत असतो. सभा शांततेत सुरू असताना महिला पोलिस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्‍यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयी संयोजकांना मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या पाहिजेत हेच आजच्या कार्यक्रमातून सांगण्यात आलं.याचा उल्लेख आधी शरद पवार यांनीही केला होता. त्यानुसार आजच्या कार्यक्रमात पोलिसांना बसण्यासाठी खुर्च्या देण्यात आल्या. शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कार्यक्रमात पोलीस अधिकारी,महिला पोलीस व कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 10:46 pm

Web Title: chair available for police in rayat shikshan sanstha program scj 81
Next Stories
1 तर बायको मला हाकलून देईल, असं अजित पवार म्हणाले आणि…
2 “… तर मी स्वतः औरंगाबादचं नाव संभाजी नगर होण्यासाठी पुढाकार घेईन”
3 कॉलेजने मुलींना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ
Just Now!
X